About Me

हरी ॐ
मी पूर्वाश्रमीची सुप्रिया विजय नार्वेकर आणि आता सुप्रिया अजिंक्य रुमडे.

एका मध्यमवर्गीय सुसंस्कृत कुटुंबात जन्माला आले. इतरांसारखेच सुंदर , अवखळ असे बालपण गेले.१०वी  पर्यंतचे शिक्षण बोरिवलीच्या चोगले हायस्कूल मधून आणि १२ वी पर्यंतचे शिक्षण दादरच्या कीर्ती college मधून पूर्ण केले. लहानपणापासूनच कलेची आवड होतीच मग MAAC मधून चा ३D Animation आणि Graphic Designing चा ३ वर्षांचा diploma पूर्ण केला.आता Mitashi Edutainment Pvt Ltd  मध्ये Sr.Visualizer  म्हणून कार्यरत आहे.

योगा , gymnastics, कबड्डी , volley-ball ह्यांनी शाळेची वर्ष जबरदस्त गेली. ह्या सगळ्या प्रवासामध्ये खूप काही शिकले पण खऱ्या अर्थाने फुलले, बहरले ते २००० पासून.  कारण Dr. अनिरुद्ध धैर्यधर जोशी म्हणजेच माझा बापू , माझा dad मला भेटला आणि माझ्या आयुष्याला एक नवीन आणि उत्तम दिशा मिळाली.
जगायाचे कसे आणि जगवायचे कसे हे माझ्या बापूने मला शिकवले आणि आजही शिकवतो आहे आणि शिकवत राहणार .
माझ्या बापूच्या सहवासात माझ्या आयुष्याचे सोने झाले .

माझ्या blog चे नाव "मी माझ्यातली " ह्याचे कारण
मी एक सामान्य आयुष्य जगत होते, लिहिण्याची , Designing ची कला होतिच. पण ती कला खऱ्या अर्थाने बहरली ती माझ्या बापूमूळे.
माझ्यातली मी मला माझ्या बापूने दाखवून दिली. माझा बापू माझा सर्वस्व आहे.  माझा Dad आहे . बापू तू मला दिलेली कला तुझ्या चरणी  अर्पण .
अनिरुद्धार्पणमस्तू .
मी अम्बज्ञ आहे .

चला तर मग भेटूया माझ्या  "मी माझ्यातली " blog मध्ये !!!

4 comments:

  1. I am glad to see your blogs...Its going to be very helpful for us...All the Best for new Adventure... ;)

    ReplyDelete
  2. Thanks Kalpesh
    and i ll definitely try my best...

    ReplyDelete